संपादकीय

एन.टी.सी.मील एरियातील हजारो लोकांचे जिवन पुरामुळे उध्वस्त करणारा चुनाल नाला बंद करण्याची मागणी..

नादेड:- शहरातील एन.टी.सी मील एरियातील हजारो लोकांचे पुरामुळे जिवन उध्वस्त करणारा चुनाल नाला बुजवून बंद करण्याची मागणी रिपाई (गवई) चे जिल्हा उपाध्यक्ष दिपक सातोरे यांनी निवेदना मार्फत महापालीका आयुक्त जिल्हाधिकारी व तहसिलदार याच्याकडे केली आहे.

नांदेड शहरापासून जवळ व गोदावरी नदी पासून १० कि.मी अंतरावरील मौजे वाडी या गावातून सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली नाली. पुढे जावून तिचे मोठ्या नाल्यात रुपांतर होऊन नाव चुनाल नाला हा मौजे वाडी खडकपूरा, समिराबाग, दुल्हेशाह रहेमाननगर, पंचशिलनगर, गंगाचाळ, या भागातून वाहत जावून छोटया नदीचे स्वरुप घेत गोदावरी नदीच्या पात्रात मिसळतो तर दुसरा नाला शक्तीनगर, सोमेश कॉलनी, नल्लागुटाचाळ, देगावचाळ, गंगाचाळ, भागातून वाहत येवून चुनाल नाल्यास मिळतो. पावसाचे पाणी अतिवृष्टी किंवा धरणाचे पाणी नदीत सोडल्याने बॅक वॉटरमुळे या परिसरात अनेकदा पुर आलेत यापूर्वी वर्ष १९६२, १९८३,२००५,२००६ २०२३,२०२४,२०२५ ला चुनाल नाल्याला मोठा पूर येवून एन.टी.सी.मील परिसरातील खडकपुरा, समीराबाग, तहुराबाग, दुल्हेशाह रहेमाननगर, व्हिक्टोरीयाचाळ, नल्लागुटाचाळ, देगावचाळ, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, मिमघाट, गंगाचाळ, गोलचाळ, पक्कीचाळ, श्रावस्तीनगर या भागातील लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरुन घर, कपडे, धान्य, संसार उपयोगी सामुग्री विद्यार्थ्यांचे वहया -पुस्तके व दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी आलेल्या पुरामुळे एका सोळा वर्षीय बालकाचा घरातील सामान काढताना पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे येथे राहणारे रहिवाशी हे गोरगरीब असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. तरोडा भागातील कॅनाॅल बंद करुन त्यावर पक्का रस्ता तयार केला गेला. त्याच धर्तीवर चुनाल नाला बुजवून बंद केल्यास या परिसरातील वस्त्यांमध्ये बॅकवॉटर,पुराचे पाणी येणार नाही आणि या संकटापासून येथील लोक कायमचे मुक्त होतील अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (गवई) चे जिल्हा उपाध्यक्ष- दिपक सातोरे यानी महानगरपालीका आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना दिले आहे.

Back to top button