बीड

आमदार सुरेश धस आमदार व्हावेत म्हणून केलेल्या नवसाची पूर्तता

आमदार सुरेश धस आमदार व्हावेत म्हणून केलेल्या नवसाची पूर्तता
ग्रामस्थांकडून बैलगाडीतून भव्य मिरवणूक;  उत्स्फूर्त स्वागत
आष्टी (प्रतिनिधी):-आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते सुरेश धस यांचा विधानसभेत विजय व्हावा म्हणून तालुक्यातील चिंचोली येथील श्री स्वामी समर्थ गडावर एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन दातीर यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस केला होता. या नवसपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवारी गावात बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मिरवणुकीदरम्यान आमदार सुरेश धस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, “सचिनने अत्यंत श्रद्धेने हा कार्यक्रम ठेवला, त्याने केलेला नवस आज पूर्ण झाला आहे. समाजात परस्पर सहकार्याची भावना जिवंत ठेवणे ही खरी सेवा आहे. श्री स्वामी समर्थ हे ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ असा संदेश देतात. आज आपल्या परिसरात होत असलेले हे मंदिर आणि श्रद्धेचा हा उत्सव समाजाला प्रेरणा देणारा आहे. सचिन आणि सर्व ग्रामस्थांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी आपल्या भाषणात तरुणांना व्यसनाच्या आहारी जाऊ नये, समाजकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. आपल्या परिसरात होत असलेले श्री स्वामी समर्थ हे मंदिर धार्मिक स्थळ बनले आहे.
यावेळी सचिन दातीर म्हणाले की, “दुष्काळात सर्वात मोठी छावणी असो, उत्तराखंडचा महाप्रलय असो, कोरोना काळ असो किंवा अलीकडचा महापूर — प्रत्येक संकटकाळात २४ तास धावून येणारा नेता म्हणजेच आपले आमदार सुरेश धस. लोकांनी नेहमी अशा धडाडीच्या आणि प्रामाणिक नेत्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळेच आपल्या भागाला आमदार म्हणून त्यांची गरज होती आणि याच भावनेने मी हा नवस बोललो होतो.राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे की ,माझा हा मेहनती, सतत जनतेसाठी लढणारा नेता मंत्रीपदी विराजमान करावेत असा मी पुन्हा त्यासाठी नवस बोलतो. येणाऱ्या काळात जर आमदार सुरेश धस मंत्री झाले तर मी मुख्यमंत्र्यांसह त्यांची याच स्वामी समर्थ गडावर पेढे तुला करेल. असेही शेवटी दातिर म्हणाले.
 या सोहळ्यासाठी चिंचोली गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. बैलगाड्यांची सजावट, श्री समर्थ महाराजांच्या जयघोषात काढलेली मिरवणूक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून झालेली शोभायात्रा पाहण्यासारखी होती. या नवस्फूर्ती सोहळ्या निमित्ताने उपस्थित त्यांना सचिन दाते यांच्याकडून महापंगत देऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, संदीप खकाळ, राजेंद्र दहातोंडे, अंकुश चव्हाण, अशोक लगड, रवींद्र ढोबळे, रामेश्वर चव्हाण, सरपंच हनुमंत अडागळे, संपत कोळेकर, उद्धव कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बन्सोडे सर यांनी केले.यावेळी कांतीलाल देवकर,शिवलाल थोरवे, रोहिदास जगताप, आप्पासाहेब देवकर, संतोष देवकर,सागर जगताप, महेश जगताप, हनुमंत अडागळे, हिम्मत बाबर, उद्धव कर्डिले, बलभीम दातीर, अनिल दातीर,विजय कापरे, भीमराव देवकर, शांतीलाल चोरमले, जावेद शेख,अंकुश एकशिंगे, कानिफ एकशिंगे, सुदाम दातीर, बाजीराव गवळी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक आणि वयोवृद्ध मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले.
Back to top button