बीड
वैराग्याचे मूर्तिमंत रूप शांतीब्रम्ह नवनाथ बाबा:- ह भ प गोपाळ महाराज थोटे

वैराग्याचे मूर्तिमंत रूप शांतीब्रम्ह नवनाथ बाबा:- ह भ प गोपाळ महाराज थोटे
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमा निम्मित कीर्तन व महाप्रसाद
बीड (प्रतिनिधी) श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे चैत्र पौर्णिमेच्या निम्मित गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज मठाधिपती महंत श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ह भ प गोपाळ महाराज थोटे यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाले
अभंग विवेचन करताना थोटे महाराज यांनी संताच्या ठाई वैराग्य असते; धन, सत्ता, संपत्ती, मान, सन्मान ज्यांच्या साठी माती समान असते तेच खरे वैराग्यवंत;आज वैराग्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज हे होय असे अभंग विवेचनात ह भ प थोटे महाराज यांनी भावना व्यक्त केली
शांतीब्रह्म एकनाथ महाराज नंतर शांतीब्रम्ह हि उपाधी खरोखर दोन संतानी जपली व त्याचं शोभून दिसते ते म्हणजे आळंदीचे ह भ प कुरे महाराज व श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज हे होय असे थोटे महाराज यांनी सांगितले
मनुष्य आयुष्यभर धन, सत्ता संपत्ती मिळवण्याच्या स्पर्धात आयुष्य खर्च करतो खरं सुख माणसाला मिळतच नाही मनुष्याला खरं सुख मिळण्याच असेल तर संताची कृपा असावी लागते. जीवनच खर सुख संताच्या विचारात आहे. म्हणून मनुष्याने गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या चरणाचा दास व्हावे तर खर सुख मनुष्याला अनुभवता येईल असे प्रतिपादन ह भ प गोपाळ महाराज थोटे यांनी कीर्तन सेवेत व्यक्त केले
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे चैत्र पौर्णिमेच्या निम्मित कीर्तन कार्यक्रमात टाळकरी, माळकरी विणेकरी मृदंग वादक भजनी मंडळी भाविक भक्तांची उपस्थिती होती चैत्र पौर्णिमेची महाप्रसादाचा पंगत जि.प. सदस्य गंगाधर भाऊ घुमरे, रमेश घुमरे, बाळासाहेब घुमरे, अण्णासाहेब लांडे यांची महाप्रसाद पंगत होती



