📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ऑलिम्पियाडमध्ये शौर्य डोंगरेला गोल्ड मेडल

ऑलिम्पियाडमध्ये शौर्य डोंगरेला गोल्ड मेडल
बीड/ प्रतिनिधी
शहरातील तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये यूकेजी वर्गात शिकणारा शौर्य सुनील डोंगरे याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. लहान वयातच मिळवलेले हे यश शाळेसह जिल्ह्यात अभिमानास्पद ठरले आहे.
शौर्यच्या या यशामागे त्याची जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. तुलसी शैक्षणिक समूहाचे संचालक प्रा. प्रदीप रोडे, प्राचार्या उमा जगतकर तसेच वर्ग शिक्षिका फातिमा शहा यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडे विशेष लक्ष दिल्यानेच शौर्यने उज्ज्वल यश मिळविले आहे.
विशेष म्हणजे, शौर्य डोंगरे याने यापूर्वीही राज्यस्तरीय लिटल चॅम्प ऑन रॅम स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करत पारितोषिक मिळवले होते. त्यामुळे त्याच्या सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राहिली आहे.
शौर्यच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व पालकांकडून त्याचे कौतुक होत असून, भविष्यातही तो असेच यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान माझा मुलगा शौर्य सुनील डोंगरे याने इतक्या लहान वयात ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक मिळवून आमचं स्वप्न साकार केलं आहे. त्याच्या या यशाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. शौर्यने नेहमीच अभ्यासाबरोबर जिज्ञासा आणि सातत्य ठेवले, त्यामुळेच त्याला हे यश मिळाले आहे. या यशामागे शाळेचे संचालक प्रा. प्रदीप रोडे, प्राचार्या उमा जगतकर आणि वर्ग शिक्षिका फातिमा शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आम्ही त्यांच्या प्रति मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. शौर्यने पुढेही असेच यश मिळवत राहावे आणि मोठं नाव कमवावे, हीच आमची अपेक्षा आहे.

Back to top button