📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दोन वेठबिगर गोशाळेतून मुक्त परंतु पाच जणांचा आणखीन शोध सुरू

दोन वेठबिगर गोशाळेतून मुक्त परंतु पाच जणांचा आणखीन शोध सुरू
 बीड( प्रतिनिधी ) वडवणी तालुक्यातील टालेवाडी गावामध्ये सात कामगारांना दुसऱ्या जिल्ह्यातून आणून त्यांच्याकडून गत दोन महिन्यापासून जबरदस्तीने काम करून घेतल्या जात होते दिवसभरात  14 ते 15 तास त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांना मारहाणही केलं जायची त्यांना त्यांच्या घरी फोनही करू दिला जात नव्हते तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या एका दिवशी त्यांनी त्या गोशाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे व बीड जिल्ह्यातील गावांची माहिती नसल्यामुळे परत त्यांना पकडून आणून मालकाने हाणमार केली ते खूप भीतीदायक वातावरणामध्ये राहत होते या सर्व प्रकाराची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड ला मिळाल्यानंतर अधिकार मित्र तत्त्वशील कांबळे यांनी विवेक जॉन्सन  जिल्हाधिकारी बीड यांच्याशी संपर्क साधून यावेळी कामगारांना मुक्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले व तात्काळ या कामगारांचे मुक्तता करावी असे निर्देश दिले तदनंतर वैभव महेंद्रकर  तहसीलदार वडवणी विवेक उडान नायब तहसीलदार वडवणी त्यांची टीम व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अधिकारमित्र तत्त्वशील कांबळे व ज्ञानोबा वायबसे यांनी एक तारखेला रात्री रेस्क्यू ऑपरेशनला राबवले त्यामध्ये दोन कामगार आढळून आले व बाकीचे कामगार अंधार असल्यामुळे व लाईट नसल्यामुळे तसेच त्या ठिकाणी मोबाईल टावर नसल्यामुळे शोधता आले नाहीत सदरील दुसऱ्या कामगारांना तेथील मालकाने दुसऱ्या ठिकाणी लपवून ठेवले तहसीलदार वडवणी यांनी वडवणी पोलीस यांना पोलीस प्रोटेक्शन ची मागणी करूनही त्यांना पोलिसांची सुरक्षा मिळाली नाही त्यामुळे स्वतः तहसीलदार सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामगारांची सुटका केली सुटका केल्यानंतर मालकाच्या विरोधात वेठबिगारी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कामगारांना मारहाण झाल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय बीड येथे त्यांना दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्यांचा उपचार सुरू असून गौरव इंगोले उपविभागीय अधिकारी माजलगाव हे त्यांना सुटका प्रमाणपत्र देणार आहेत त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड कडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत सदरील कार्यवाही दरम्यान नायब तहसीलदार यांच्यावर तेथील कुत्र्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते थोडक्यात बचावले त्यांची पॅन्ट या हल्ल्यात फाटली व ते थोडेसे जखमी झाले.
   सदरील सुटका केलेल्या वेठबिगारांची विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड व न्या वाहाब सय्यद सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड भेट घेऊन त्यांची माहिती जाणून घेतली त्यांना मनमाड येथून एका एजंट ने खोटे बोलून बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एका गावात कामासाठी आणले व एजंट ने पैसे घेऊन निघून गेला त्यांना दोन-तीन हजार रुपये फक्त दिले व एजंट ने 30 ते 40 हजार रुपये त्यांच्या नावावर घेऊन त्यांना त्या गोशाळेत कामासाठी ठेवून निघून गेला तरी या सर्व प्रकरणाची चौकशी वडवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत सदरील कामगारांची जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी महसूल प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात येणार आहे. कामगारांना सुटका करण्यासाठी विनायक दिवटे, देवयानी गिराम,मंगेश बुचडे,प्रशांत बिर्ले, सिद्धेश्वर वावळ आदींचे विशेष सहकार्य लाभले.
Back to top button