📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हा विकास समन्वय दिशा समितीवर अंजलीताई ढेपे यांची नियुक्ती

जिल्हा विकास समन्वय दिशा समितीवर अंजलीताई ढेपे यांची नियुक्ती

जामखेड प्रतिनिधी :जिल्हास्तरावरील विकास प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या समितीवर जामखेड तालुक्यातील सक्रिय महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जामखेडच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्राच्या विविध पदांच्या माध्यमातून तसेच विविध शासकीय समितीच्या माध्यमातून महिलांसाठी काम करत असलेल्या महारूळी ग्रामपंचायत च्या माजी सरपंच अंजलीताई लक्ष्मण ढेपे यांची शासनाच्या जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) या समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड करण्यात आली असून समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
ही समिती केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करत असते. या समितीचे अध्यक्ष शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सहअध्यक्ष अहिल्यानगर(दक्षिण) लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे आहेत. तर सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहत असतात.

या समितीत सर्व प्रमुख खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असतो.या समितीचे सहअध्यक्ष तथा अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार अंजलीताई ढेपे यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे.

अंजलीताई ढेपे यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या माजी तालुकाध्यक्ष, महारूळी गावच्या माजी सरपंच म्हणून काम केले असून सध्या त्या दक्षता समितीच्या तालुकाध्यक्ष, महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा, तालुका विधि समितीच्या सदस्या व जामखेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सचिव अश्या पदांवर काम करत आहेत.
या पदांच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत अहिल्यानगर दक्षिण मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांच्यासह विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिशा समिती महत्त्वाची भूमिका बजावते. ढेपे यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळेल, तसेच स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Back to top button