बीड
आदित्य शिक्षण संस्था, बीड येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

—
इंग्रजी शिका, पण मराठी विसरू नका – प्रा. विकास ढोकणे
प्रतिनिधी | बीड
भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृतीची ओळख, इतिहासाची साक्ष, संस्कारांची परंपरा आहे. आपण इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषा नक्की शिकलो पाहिजे. मात्र आपल्या मराठी भाषेचा सन्मान आणि वापर कधीही कमी होता कामा नये. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत गाडगेबाबा यांनी मराठी भाषेतून समाजप्रबोधन केले. ही परंपरा जपणे हीच खरी मराठीची सेवा आहे, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथील अधिव्याख्याता प्रा. विकास ढोकणे यांनी केले. ते आदित्य शिक्षण संस्था, बीड येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आदित्य शिक्षण संस्था, बीड येथे मराठी भाषा गौरव दिन संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा आणि संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “जय मराठी, जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी मराठी भाषेप्रती आपला अभिमान व्यक्त केला. २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ‘मराठी भाषेचा गौरव आणि साहित्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथील अधिव्याख्याता प्रा. विकास ढोकणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना प्रा. ढोकणे यांनी मराठी भाषेचा इतिहास, परंपरा, वैभव अधोरेखित केले. सातवाहन राजांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण होते. त्यांच्या काळात मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला, असे त्यांनी सांगितले. पुढे मुकुंदराज, चांगदेव यांनी ‘विवेकसिंधू’सारखे ग्रंथ लिहिले. त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदित्य पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. राहुल खडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य वाघ उपस्थित होते. विभागप्रमुख एस. आय. शेख, पी. डी. दुधाळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना प्रा. अजय दुधाळ यांनी केली. मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आभार प्रा. दुधाळ यांनी मानले.
—–
विद्यार्थ्यांची मराठी संवर्धनाची शपथ
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची शपथ घेतली. शुद्ध उच्चाराने मराठी बोलणे, योग्य व्याकरणाचा वापर करणे आणि सोशल मीडियावरही मराठीचा सन्मान राखणे, असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. मराठी माझी मायबोली, मराठी माझा अभिमान अशी घोषणा देत विद्यार्थ्यांनी मराठी भाषा जपण्याचा संकल्प केला.