बीड
परळी शहर भाजपा कार्यकारिणी व विविध आघाडयांचे अध्यक्ष जाहीर

परळी शहर भाजपा कार्यकारिणी व विविध आघाडयांचे अध्यक्ष जाहीर
सहा उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस तर पाच चिटणीस आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश
परळी वैजनाथ :- राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या सूचनेवरून भाजपच्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. जुन्या- नव्यांना प्राधान्य देत सर्व घटकांना जोडणारी ही कारयकारिणी असुन सहा उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस तर पाच चिटणीसांची निवड करण्यात आली आहे. विविध आघाड्यांचे अध्यक्षही यावेळी घोषित करण्यात आले.
भाजपाच्या शहराध्यक्षपदी सौ उमाताई सन शेट्टी यांची काही दिवसांपूर्वीच निवड झाली आहे. त्यानंतर उर्वरित कार्यकारणीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आज राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या सूचनेवरून भाजपच्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली असुन त्यात उपाध्यक्ष म्हणुन विजयकुमार वाकेकर, महादेव ईटके, प्रा. पवन मुंडे, प्रशांत कराड, सौ. चंदाताई ठोंबरे, सौ. वर्षाताई जोशी यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून संदिप लाहोटी, अश्विन मोगरकर, प्रितेश तोतला यांची वर्णी लागली आहे. चिटणीसपदी अश्विन आघाव, वैजनाथ रेकने, अमोल डुबे, जितेंद्र मस्के, अनिस शेख चिटणीस हे तर कोषाध्यक्षपदी अनिष अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे.
भाजपाच्या विविध आघाडीचे अध्यक्षही जाहीर करण्यात आले असून महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी श्रीमती सुचिता पोखरकर, युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी सुशिल हरंगुळे यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी शेख शमी यांची दलित आघाडीच्या अध्यक्षपदी राहुल घोबाळे तर ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी विजय दहिवाळ यांची निवड करण्यात आली आहे.
नव्या जुन्यांना संधी देत आणि सर्व सामाजिक घटकांना कार्यकारणी मध्ये प्राधान्य देत शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी यांनी सर्वव्यापक आणि सर्वांना न्याय देणारी कार्यकारणी जाहीर केली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*ना. पंकजाताई मुंडेंनी साधले “सोशल इंजिनिअरिंग”*
भाजपाची शहर कार्यकारिणी निवडताना मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी “सोशल इंजिनिअरिंग” साधले आहे. कार्यकारणी मध्ये विविध समाज घटकातील आणि विविध स्तरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत, अनोखा योग साधला आहे. या नवीन कार्यकारणी मध्ये सर्वच घटकांना समान संधी दिल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
…



