बीड
मानूर येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन 25 लाख रु.ची ग्रा.पं.इमारत होणार

मानूर येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन
25 लाख रु.ची ग्रा.पं.इमारत होणार
25 लाख रु.ची ग्रा.पं.इमारत होणार
मानूर(प्रतिनिधी)मानूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ मंगळवार दि.18 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जवळपास 40 लाखाहून अधिक रुपयाची कामे सुरु होत आहेत. सरपंच अशोक मामा पाखरे आणि आणि उपसरपंच महेबुब पठाण यांच्या नेतृत्वाखाली मानूर ग्रा.पं.हद्दीमध्ये विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे.
मानूर येथील ग्राम पंचायत भवन-25लक्ष रु.,गोपीनाथराव मुंडे चौकाचे सुशोभिकरण -5 लक्ष रु.,नागनाथनगर ते नंदीनगर रस्ता,बडेवाडी येथील अंगणवाडी खोली आदि विकास कामांचा शुभारंभ उद्योगपती लिंबासेठ नागरगोजे,दै.दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, सरपंच अशोक मामा पाखरे, जेष्ठ नेते कलंदर काका पठाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी प्रसिध्द उद्योगपती नारायण नाना बडे, युवा उद्योजक अमोल बडे, ग्रामसेवक सिध्दार्थ खेमाडे काका, किसनराव बेळगे,दुधाजी बडे,पोपटराव सिरसाट,भारत अण्णा पाखरे,अनिल बडे,अर्जुन बनसोडे, कुमार पवार, सिताराम सुरसे,विलास बेळगे, प्रल्हाद बडे चेअरमन,उल्हास पाखरे,शौकत भाई पठाण, सुभाष सिरसाट,अलीम पठाण, महेबुबभाई बेग, दत्तू शिंदे माळी, बबन पंडागळे,पिरखा पठाण,संजय ढाकणे,म्हतारदेव बडे,प्रल्हाद बडे,संपत दुधाजी बडे,रमेशराव नाईक आदि उपस्थित होते.



