बीड

बैलगाडीची सफर करत सारोळा प्रशालेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

बैलगाडीची सफर करत सारोळा प्रशालेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

जामखेड(प्रतिनिधी) : आज दिनांक १६ जून २०२५ रोजी जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ निमित्त इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून तसेच लेझीम व झांज पथकाच्या गजरात उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणात मिरवणूक काढण्यात आली .
यावेळी जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शुभम जाधव साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास खैरे साहेब, विस्तार अधिकारी गायकवाड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ साहेब, ग्रामसेवक टेकाळे साहेब व सारोळा गावचे सरपंच अजय दादा काशिद, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाबपुष्प, गणवेश , पाठ्यपुस्तक,शूज,सॉक्स व भेटवस्तू प्रदान करून स्वागत करण्यात आले.तसेच गटविकास अधिकारी जाधव साहेब व सरपंच अजय दादा काशिद यांनी आपल्या मनोगता मधून शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थांचा आत्मविश्वास उंचावला.तसेच नूतन शैक्षणिक वर्ष निमित्त शैक्षणिक प्रवास करिता शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button