📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
==============
गेवराई दि.३०(प्रतिनिधी)
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ज्ञसंघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची भूमिका घेत उपोषण सुरू केले आहे. भर उन्हात कोणतीही पर्वा न करता ते आंदोलन करत असून, समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देत बीड जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवित मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये शिवछत्र परिवार सक्रियपणे सहभागी झाला असून, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून, मराठा समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button