📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ध्येय अॅकॅडमी परीक्षेत शौर्य पवारचे उत्तुंग यश!

जामखेड : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या “ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा-२०२५” मध्ये शौर्य प्रताप पवार याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता 8 वी गटात 86% गुणांसह राज्यात 7 वा क्रमांक मिळवून त्याने आपल्या मेहनतीची चमक सिद्ध केली आहे.सलग पाहिली ते आठवी स्पर्धात्मक परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत,शिष्यवृत्ती पाचवी मध्ये राज्यात सहावा तसेच मंथन,अभिरूप,juniar,ias,I am winner,BTS, शिष्यवृत्ती परीक्षा, लक्षवेध,आतापर्यंत प्रत्येक वर्षी राज्य गुणवत्ता यादीत आला आहे.
राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. मात्र, कठोर परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर शौर्यने स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले. त्याच्या या यशाबद्दल ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय अॅकॅडमी महाराष्ट्रा यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल शौर्य प्रताप पवारचे शिक्षक, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश त्याच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Back to top button