📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या वतीने ‘खेळ मंगळागौरीचा’ जल्लोषात साजरा

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या वतीने ‘खेळ मंगळागौरीचा’ जल्लोषात साजरा

*बीड, दि. ९ सप्टेंबर (प्रतिनिधी) -* रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या वतीने भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रावण महिन्यातील मांगल्याचे प्रतीक असलेला ‘खेळ मंगळागौरीचा – खेळ संस्कृतीचा, मेळ आपुलकीचा’ हा आगळावेगळा सांस्कृतिक व कौटुंबिक स्नेह मेळावा बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता हॉटेल निलकमल येथे  मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला..
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून बीडच्या माजी नगराध्यक्षा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व मा. सौ. डॉ. दिपाताई क्षीरसागर आणि दैनिक लोकपत्रच्या महिला जगत पुरवणीच्या संपादिका, महिला प्रश्नांवर आक्रमकपणे लढणाऱ्या झुंजार नेत्या मा. सौ. डॉ. आशाताई वरपे या लाभल्या होत्या. तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर मा. श्री. डॉ. रो. मेघराज पिंगळे व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. हरीश मोटवानी हे विशेषत्वाने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलनाने मा. डॉ. दिपाताई क्षीरसागर, मा. डॉ. आशाताई वरपे, मा. श्री. डॉ. रो. मेघराज पिंगळे, अध्यक्ष रो. चंद्रप्रकाश सेठी, सचिव रो. इंजि. मनोज थिगळे, या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन रो. आशा भारती, प्रोजेक्ट को-चेअरमन रो. डॉ. निलेश जगदाळे आणि PDG रो. हरीश मोटवानी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
मा. डॉ. दिपाताई क्षीरसागर यांचे स्वागत रो. बसंता सेठी व रो. आशा भारती यांनी, मा. डॉ. आशाताई वरपे यांचे स्वागत रो. मयुरी थिगळे व रो. सोनिका जगदाळे यांनी, तर असिस्टंट गव्हर्नर डॉ. रो. मेघराज पिंगळे यांचे स्वागत अध्यक्ष रो. चंद्रप्रकाश सेठी व रो. इंजि. नितीन गोपन यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रो. इंजि. मनोज थिगळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून रोटरी क्लब फक्त सेवा कार्यच करत नाही तर कुटुंब व संस्कृती जपण्याचे कार्य देखील करते असे सांगितले. प्रमुख पाहुण्या डॉ. दिपाताई क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात “आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा पारंपरिक खेळांमुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि मानसिक ताण कमी होतो” असे सांगितले. डॉ. आशाताई वरपे यांनी “मंगळागौर हा फक्त खेळ नसून तो स्त्रीच्या सर्जनशीलतेचा आणि एकजुटीचा उत्सव आहे” असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. कु. अनुषा जैन हिने सादर केलेल्या सुंदर गणेश वंदनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर कु. केनिषा जैन हिने सादर केलेल्या कथक प्रस्तुतीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.यानंतर रोटरी ॲन्ससाठी गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ज्योती लोळगे, रो. उषा ढेरे, रो. आशा भारती व ओवी तळेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात मराठी व हिंदी गीते सादर करून मैफल रंगतदार केली.अनिता शिंदे व शैलेजा चिलवंत, ज्योती लोळगे व दुर्गा लोळगे यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यांनी सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे मुख्य आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आकर्षण म्हणजे ‘खेळ मंगळागौरीचा’ हा होता. श्रावणात नवविवाहित महिला मंगळागौरीचे व्रत करतात आणि रात्री जागरण करून पारंपरिक खेळ खेळतात. हीच लोप पावत चाललेली संस्कृती रोटरी मिडटाऊनने पुन्हा एकदा जिवंत केली.
यामध्ये सहभागी कलाकार म्हणून सोनिका जगदाळे, नक्षत्रा जगदाळे, मयुरी थिगळे, मृण्मयी थिगळे, रो. अनिता शिंदे, ज्योती लोळगे, रो. आशा भारती, रो. उषा ढेरे, साधना बोरा, रो. प्रीत कुकडेजा, मनीषा देशमाने, रो. नीता सानप या महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या परिधान करून फुगडी, एका हाताची फुगडी, दोन हाताची फुगडी, त्रिफुला, झिम्मा, गोफ, बसफुगडी, लाटणे-लाटणे असे तब्बल १५ ते २० पारंपरिक खेळ सादर केले. ढोलकीच्या ठेक्यावर आणि पारंपरिक गाण्यांवर महिलांनी धरलेला ठेका आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित सर्वांनीच या खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
तसेच रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे मुखपत्र असलेल्या ‘रोटरी मिरर’ या मासिक बुलेटीनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बुलेटीनचे संपादक बुलेटीन एडिटर रो. डॉ. निलेश जगदाळे व रो. प्रदीप शेटे यांनी केले आहे. या मिररमध्ये क्लबच्या मागील महिन्यातील सर्व सेवा प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे.
हा कार्यक्रम केवळ मनोरंजन नव्हता, तर नवीन पिढीला आपली संस्कृती समजावी आणि महिलांना एकत्र येऊन आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या हेतूने आयोजित करण्यात आला होता.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन रो. आशा भारती व रो. डॉ. निलेश जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता भोसले  यांनी तर आभार प्रदर्शन सचिव रो. इंजि.मनोज थिगळे यांनी केले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे सर्व सदस्य त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Back to top button