बीड
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीडमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘माझा बाप्पा इकोफ्रेंडली स्पर्धा’

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीडमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘माझा बाप्पा इकोफ्रेंडली स्पर्धा’
माझा बाप्पा इकोफ्रेंडली स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – नगरसेविका सौ. मनिषा गिराम, जिल्हा प्रमुख उल्हास गिराम
बीड दि. (प्रतिनिधी): बीड शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बीड जिल्हाप्रमुख उल्हास प्रकाशराव गिराम आणि बीड नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. मनीषा उल्हास गिराम यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा घेतली जात आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेचे नियम व अटी :
विनामूल्य प्रवेश: ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.
घरीच मूर्ती बनवणे: विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती स्वतःच्या घरीच तयार करायची आहे.
पर्यावरणपूरक साहित्य: मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती, लाल माती किंवा कागदाचा लगदा यांसारख्या विघटनशील साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे.
साहित्य वाटप: आयोजकांकडून स्पर्धकांना कोणतेही साहित्य दिले जाणार नाही.
मूर्ती जमा करण्याचे ठिकाण व तारीख: पूर्ण झालेली मूर्ती दिनांक २० सप्टेंबर २०२६ पर्यंत शिवसेना कार्यालय, हॉटेल मैथिली शेजारी, बीड येथे जमा करायची आहे.
स्पर्धेचे गट व बक्षीसांचे स्वरूप :
स्पर्धा दोन गटांत विभागण्यात आली असून आकर्षक रोख रकमा, स्मार्ट वॉच, शिल्ड व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
अ – गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) :
प्रथम क्रमांक: ₹ २,१००/- रोख, स्मार्ट वॉच, शिल्ड व सहभाग प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ₹ १,५००/- रोख, स्मार्ट वॉच, शिल्ड व सहभाग प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: ₹ १,१०/ – रोख, स्मार्ट वॉच, शिल्ड व सहभाग प्रमाणपत्र
ब – गट (इयत्ता ८ वी ते १० वी) :
प्रथम क्रमांक: ₹ ३,१००/- रोख, स्मार्ट वॉच, शिल्ड व सहभाग प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ₹ २,१००/- रोख, स्मार्ट वॉच, शिल्ड व सहभाग प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: ₹ १,५००/- रोख, स्मार्ट वॉच, शिल्ड व सहभाग प्रमाणपत्र
शाळेसाठी विशेष बक्षीस :
ज्या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील, त्या एका शाळेस ₹ ५,०००/- रोख आणि ‘बाळासाहेब ठाकरे सन्मानचिन्ह’ देऊन गौरवण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे: ९१५८९६३७३७,९६९६३७३७३७, ९८९०१५३३११
पर्यावरणरक्षणाचा संदेश देणाऱ्या या अनोख्या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक उल्हास गिराम व सौ. मनीषा गिराम यांनी केले आहे.



