बीड

माऊली मंदिरात महाअभिषेक, २०९ रक्तदात्यांचा सहभाग — मनोज दादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी सोहळा

माऊली मंदिरात महाअभिषेक, २०९ रक्तदात्यांचा सहभाग — मनोज दादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी सोहळा

पुणेआळंदी :मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी नगरीत सामाजिक ऐक्याचा भव्य सोहळा पार पडला. सकल मराठा समाज आळंदी व पंचक्रोशीच्या वतीने ज्ञानदर्शन धर्मशाळा, भैरवनाथ चौक येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल २०९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संत श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात महापूजा व दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. डी. डी. भोसले पाटील, ह.भ.प. पृथ्वीराज महाराज जाधव, श्री. जालिंदर महाराज भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमास शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करून सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण ठेवले. कार्यक्रमास नगराध्यक्ष राहुल शेठ चिताळकर पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत दादा कुऱ्हाडे, नगरसेवक दिनेश घुले, रामभाऊ आबा भोसले, सचिन अण्णा गिलबिले, अशोक उमरगेकर, सागर रानवडे, प्रितेश रानवडे, आशिष गोगावले, किरण येळवडे, उत्तम दादा गोगावले, सुरेश नाना झोबांडे, कुंडे साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे, प्रल्हाद टकले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रसिद्धीसाठी विलास काटे, एम.डी. पाखरे, दिनेश कुऱ्हाडे, सुहास सावंत, अर्जुन मेदनकर, श्रीकांत बोरावक्के आदी पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “असे उपक्रम समाजात एकतेचा, बंधुभावाचा आणि मानवतेचा संदेश देतात. सकल मराठा समाज भविष्यातही हे कार्य अविरतपणे सुरू ठेवेल.”
मनोज दादांच्या वाढदिवसानिमित्त महाभिषेक, रक्तदान आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम घडवणारा हा कार्यक्रम अखंड मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला. नियोजनात अरुण कुरे, भागवत शेजुळ, शशीराजे जाधव, माऊली गलबे, श्रीकांत काकडे, रवि कदम, माऊली घुंडरे, सुहास सावंत यांचा विशेष सहभाग होता.

Back to top button