📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा.हिना सय्यद व राजेंद्र गोरे यांच्या प्रचारार्थ! प्रभाग ८ मध्ये काॅर्नर सभा

प्रा.हिना सय्यद व राजेंद्र गोरे यांच्या प्रचारार्थ! प्रभाग ८ मध्ये काॅर्नर सभा

पायाभूत सुविधांवर रोहित पवारांचे आश्वासन

जामखेड प्रतिनिधी:
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराला वेग येत असून नगरसेवक पदाच्या उमेदवार सय्यद हिना इस्माईल आणि गोरे राजेंद्र आजिनाथ तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या राळेभात यांनी प्रभागातील मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.

काॅर्नर सभा, घरोघरी भेटी आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधत उमेदवारांनी नागरिकांच्या स्थानिक समस्या, प्रभागातील विकासाची गरज आणि सुरक्षिततेसंबंधी मुद्दे मांडले आहेत.
चर्चेदरम्यान मतदारांनी उमेदवारांना दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आमदार रोहित पवार यांनी काॅर्नर सभेत प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता,रस्ते,पाणीपुरवठा आणि नागरि सुविधांच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उमेदवार राजेंद्र गोरे व प्रा.हिना सय्यद यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांचा कल सकारात्मक असल्याचे नमूद करत प्रभाग क्रमांक ८ मध्ये यंदा विकासाभिमुख नेतृत्वाला संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Back to top button