मुंबई

महिला सक्षमीकरण फक्त नावापुरतेच..!!

आजच्या धावत्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आणि घर चालवण्याच्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला सक्षमीकरणाची नितातं गरज आहे. पण हे सक्षमीकरण बोलण्यापुरतेच मर्यादित आहे का ? (आजच्या परिस्थितीनुसार)
मागच्या एक महिन्यापासून एक प्रकरण चांगलेच महाराष्ट्रात गाजताना दिसून आले होते. यात २१ वर्षीय मुलीच्या आत्महत्येमध्ये थेट एका मंत्र्यांचे नाव पुढे आल्यानंतर या प्रकरणाला आणखी हवा मिळाली होती. मुलीसह फोटो, व्हिडिओ , दवाखाण्याचे रिपोर्ट, आईवडिलांची साक्ष या सर्व प्रकारात तिने काय-काय सहन करून आत्महत्येचे पाऊल उचलले की तिला मारून टाकण्यात आले हा विषयच मागे राहून गेला होता.
“पाप करा अन देवाला हात जोडा” असाच काहीसा प्रकार त्या दिवशी पोहरादेवी गडावर दिसून आला होता. “मी नाही केले मला फसवलं जात आहे” हे सांगायला जर १५ दिवस उलटत असतील तर डाल मे कुछ काला है ! हे समजायला आजची पिढी अशिक्षित राहिलेली नाही.

आता त्यात पितळ उघड केले जात असताना या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या महिलेच्या पतीची सहा वर्ष जुनी केस बाहेर काढून तीच तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच संबंधित मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजेच हे पाप त्यानेच केले आहे असेच यातुन सिद्ध होते.

आज बड्या बाता मारून महिलेच्या रक्षणासाठी दिशा कायदा केला मात्र आपल्याच पक्षातील मंत्र्यांचं नाव गुंतल्यावर तोच कायदा ह्या सरकारने कचऱ्याच्या डब्यात फेकला. मात्र आज परस्त्रीला हात लावणाऱ्यांचे हात छाटणाऱ्या राजा शिवछत्रपती महाराजांच्या राज्यात एका बलात्कारी मंत्र्याला लाल कार्पेट टाकून पुन्हा मंत्रालयात आमंत्रित केले जात आहे हीच या महाराष्ट्राची मोठी शोकांकिता आहे.

Back to top button