📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रायगड

कर्जत चाटफाटा ते श्रीराम पुल दहिवली पर्यंत रस्त्यावरील खड्डे भरा. … भुषण राणे

कर्जत चाटफाटा ते श्रीराम पुल दहिवली पर्यंत रस्त्यावरील खड्डे भरा. … भुषण राणे

कर्जत (जयेश जाधव )
गेल्या कित्येक दिवसापासून पावसाळा सुरू झाल्यावर कर्जत चारफाटा ते श्रीराम पुलापर्यंत रस्त्यावर प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना , वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या खड्‌ड्यांमुळे गाड्यांची होणारी ट्रॅफिक हा कळीचा मुद्दा बनला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे पावसाळी पाण्याने भरल्यामुळे, खड्ड्यांचा अंदाज न आल्याने लहान मोठे अपघात झाले आहे तरी हे खड्डे लवकरात लवकर भरावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल अशा इशारा मनसेचे कर्जत तालुका उपाध्यक्ष भुषण राणे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिला आहे .

कर्जत चारफाटा ते श्रीराम पुलापर्यंत रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून माती आणि खडीचा भराव टाकून कसेबसे खड्डे भरून वेळ मारून नेऊ नये. खड्डे भरतेवळी ठेकेदाराकडून चांगल्या पद्धतीने खड्डे भरून MSRDC आपल्या कामाच्या दर्जा उत्तम राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरून पुन्हा वाहनचालकांना खड्डे मुक्त प्रवास करता यावा वत्याचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने काम सुरू करावे अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा इशारा ‌शेवटी दिला आहे.

Back to top button