बीड

“सर कोणतेही काम हक्काने सांगा ” ! मी संस्कारचाच विद्यार्थी आहे .- नगरसेवक राहुल गुरखुदे

“सर कोणतेही काम हक्काने सांगा ” ! मी संस्कारचाच विद्यार्थी आहे .- नगरसेवक राहुल गुरखुदे
बीड – नुकतीच बीड नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली . यावेळी अनेक नगरसेवक विविध पक्षातून जिंकले विविध पक्षांमध्ये संस्कार विद्यालयातील विद्यार्थी सुद्धा यावेळेस आपला नशीब आजमावत होते . त्यापैकीच एक राहुल गोपाल गुरखुदे . यांनी निवडणुकीमध्ये विजयश्री प्राप्त केली व नगरसेवक होण्याचा बहुमान मिळवला . संस्कार विद्यालय असलेल्या प्रभागातच ते नवनिर्वाचित नगरसेवक झाले आणि त्यांनी या प्रभागामध्ये अत्यावश्यक कार्यासाठी भेट दिली तेव्हा त्यांनी शाळेमध्ये येऊन आज सर्व शिक्षकांची भेट घेतली . यावेळी त्यांचा शिक्षक वृंदांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला . याप्रसंगी संस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक सरदे सर प्रशासकीय अधिकारी राजेश राजा व संस्कृत अध्यापक प्रेरक वैद्य सर यांची विशेष उपस्थिती होती . प्रेरक वैद्य सरांनी नगरसेवक राहुल गुरखुदे यांचा यावेळी परिचय करून दिला तसेच संस्कारच्या जुन्या स्मृती जागृत केल्या .
यावेळी सत्काराला उत्तर देताना राहुल गुरखुदे म्हणाले की सर मी संस्कार विद्यालयाचाच आपला विद्यार्थी आहे कोणतेही काम मला आपण हक्काने सांगा मी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही . आपल्या सर्वांचा तो अधिकार आहे विद्यार्थी म्हणून तुम्ही मला कधीही फोन करा आणि काम सांगा . असे कृतज्ञतापूर्वक विनम्र निवेदन नगरसेवक राहुल गुरखुदे यांनी केले .
Back to top button