बीड

खांबाला करंट लागल्याची माहिती मिळताच आरती बनसोडे यांची तत्काळ धाव; पीव्हीसी पाईप लावून प्रश्न मार्गी

खांबाला करंट लागल्याची माहिती मिळताच आरती बनसोडे यांची तत्काळ धाव; पीव्हीसी पाईप लावून प्रश्न मार्गी
बीड ( प्रतिनिधी )
आज सकाळी प्रभाग क्र. १४ मधील पिंगळे नगर परिसरात एका विद्युत खांबाला करंट येत असल्याने त्या खांबाला चिटकून एका कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी नगरसेविका आरती बनसोडे यांना तात्काळ माहिती दिली.
माहिती मिळताच नगरसेविका आरती बनसोडे यांनी विलंब न करता विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी आणून पाहणी केली. संभाव्य धोका लक्षात घेऊन विद्युत खांबावर पीव्हीसी पाईप बसवून तात्काळ दक्षता घेण्यात आली.
सदर ठिकाणी शाळा असल्याने लहान मुले मोठ्या प्रमाणावर खेळत असतात. त्यामुळे वेळेवर उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक रंजीत बनसोडे, नगरसेविका आरती बनसोडे, नगरसेवक प्रमोद शिंदे, लाईनमन लहाने सर तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Back to top button