📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सौ.के.एस.के. महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची  जयंती साजरी

सौ.के.एस.के. महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची  जयंती साजरी
बीड(प्रतिनिधी)ः सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथे अंधश्रध्दा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनासारख्या माध्यमानी समाजसुधारणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर  यांच्या मार्गदर्शनानुसार  कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास  महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी  डॉ.यादव घोडके,  डॉ.विनायक चौधरी, प्रा.उमाकांत बोबडे,बी.जे.राठोड आदीसह महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Back to top button