चैतन्य वाव्हळचे सभापती प्रा.राम शिंदे कडून अभिनंदन व सहकार्याचे आश्वासन

चैतन्य वाव्हळचे सभापती प्रा.राम शिंदे कडून अभिनंदन व सहकार्याचे आश्वासन
जामखेड (प्रतिनिधी) :दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे पाच महिन्यांपूर्वी पायलट ट्रेनिंगसाठी रवाना झालेला जामखेडचा तरुण चैतन्य विशाखा नितीन वाव्हळ हा नाताळ सुट्टी निमित्ताने भारतात परतला आहे. वाव्हळ कुटुंबाने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची अहिल्यानगर येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा घेतल्या.
चैतन्य हा जामखेडमधील युवा नेते राजेश वाव्हळ व माजी नगरसेविका विद्याताई वाव्हळ यांचे पुतणे तसेच नितीन व विशाखा वाव्हळ यांचा चिरंजीव असून लवकरच तो प्रायव्हेट पायलट लायसन्सचा पहिला टप्पा पार करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कमर्शियल पायलट लायसन्स प्राप्त होताच देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान कंपन्यात पायलट म्हणून काम करण्याची त्याला संधी मिळणार आहे . जामखेड तालुक्यातील पहिला पायलट पदासाठी साठी प्रयत्न करणारा तरुण म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक झाले आहे होत आहे.
या भेटीवेळी प्रा. राम शिंदे यांनी चैतन्यच्या निवडलेल्या करिअर मार्गाचे अभिनंदन करून त्याला भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



