पी.एम, श्री. ‘जि.प.प्राथ.शाळा, धोत्री येथे योग शिबीर संपन्न

पी.एम, श्री. ‘जि.प.प्राथ.शाळा, धोत्री येथे योग शिबीर संपन्न
जामखेड प्रतिनिधी;-जामखेड तालुक्यातील साकत केंद्र येथील धोत्री येथे दि. 22/2/2025 रोजी पी. एम् श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , तालुका जामखेड जि.अहिल्यानगर येथे योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले.
योगामुळे विद्यार्थाने शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे विद्यार्थांच्या जडणघडणीत योगाला अन्यसाधारण महत्व आहे.असे प्रतिपादन योग शिबिराच्या उद्घाटनावेळी योग प्रशिक्षक बाळासाहेब पारखे सर यांनी केले.
योग शिबिराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष घनश्याम अडाले यांनी केले.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख नवनाथ बडे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
योग शिबिरासाठी अविनाश कदम, शा.व्य समिती शिक्षण तज्ञ सदस्य शेषराव सपकाळ, ज्ञानदेव सुपेकर, हिरामण खैरे, सुनिल खैरे, रणजित खेडकर, अशोक काळभोर, नवनाथ अडाले, रामदास काळभोर, ईश्वर भोसले, नवनाथ कदम,सनी तुपे ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला खरपुडे, सहशिक्षक अभिमान घोडेस्वार आदी उपस्थित होते.



