संपादकीय

नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?

 

नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून आता विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीदेखील टीका केली आहे. तसेच अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.

तुपकर म्हणाले की, मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, आणि आम्हाला नाही. अमरावती कारण असो किंवा कोविड – ते काय कोविड न होणारे जॅकेट घालून येतात का? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांची परवानगी नसताना रविकांत तुपकर यांनी नागपुरात संविधान चौकात आंदोलन सुरु केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, अन् आम्हाला मिळत नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला आहे. नागपूरात १४४ धारा लागू असल्यामुळे तुपकर यांच्या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही तुपकर यांनी आंदोलन पुकारलं आहे. नागपुरातील संविधान चौकात रविकांत तुपकार यांनी आंदोलन पुकारलं आहे. परवानगी नसताना आंदोलन करणाऱ्या तुपकारावर प्रशासन काय कारवाई करतात? हे याकडे लक्ष लागलं आहे.

Back to top button