संपादकीय

भाई जगताप-झीशान सिद्धीकीमधला वाद पेटला,काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र

 

मुंबई | मुंबई काँग्रेस पक्षातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सिद्दीकी यांनी जगताप यांच्यावर अपमानास्पद वागणूक आणि अन्यायाचा आरोप केला असून कारवाईची मागणी केली आहे.

दुसरीकडे, जगताप यांच्या निकटवर्तीयांनी सिद्दीकी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी निकटवर्तीयांनी म्हटलं की, वांद्रे (पूर्व) च्या आमदाराने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गैरवर्तन आणि अनुशासनहीन कृत्य केले ज्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.

या बैठकीत जगताप आणि सिद्दीकी यांच्यातील वाद सुरू झाला. राजगृह येथे झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते आणि ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आत जाऊ दिले नाही, असा दावा सिद्दीकी यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात झिशान यांनी असाही दावा केला आहे की, जगताप यांनी मला धक्काबुक्कीही केली आणि माझ्या समुदायाविरुद्ध “अपमानास्पद शब्द” वापरले. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी झिशान यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, बैठकीतून बाहेर काढण्यावर नेत्यांनी म्हटलं की, जगताप यांनी मला सर्वांसमोर अशी वागणूक द्यायला नको होती…भाई जगताप यांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्याबद्दल आणि माझ्या समाजाबद्दल अत्यंत अपमानास्पद बोलले. सिद्दीकी यांनी दावा केला की, भाई जगताप यांनी माझ्यावर सातत्याने अन्याय केला आहे. मी जन्मापासूनच खरा काँग्रेसी आहे… माझा तुमच्यावर (सोनिया) विश्वास आहे की तुम्ही कठोर कारवाई कराल अशी मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button