शेतक-यांच्या विकासासाठी कठिबद्ध- माने

मार्डी प्रतिनिधी :- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा प्रचार
अंतिम टप्यात आला असून, मार्डी येथील कॉर्नर बैठक पार पडली यावेळी शेतक-यांच्या विकासासाठी सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विजयी करा असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी येथील कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. या कॉर्नर सभेस भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार अविनाश मार्तंडे, बृहत विकास सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन अरुण मुडके, दिलीपराव माने सोसायटीचे चेअरमन मनोहर जगताप, व्हाईस चेअरमन दिनकर डांगे, भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, अॅड. इंद्रजित पाटील, अशोक पाटील, युवराज जगताप, मदन म्हेत्रे, पोपट साठे, गणेश पवार, संजय इनामदार, आरती नारायणकर, मनोहर विटकर, वंदना राजमाने, संतोष कदम, युवराज पवार, अजहर शेख, मल्हारी काळे, प्रभाकर फुलसागर, भास्कर पाटील, बाळासाहेब पाटील, कमलाकर माने, शंकर पाटील, भगवान कदम, अशोक इनामदार, राजेंद्र परसे, नागनाथ भालेराव, संजय वानकर, संजय वडजे, वसंत हजारे, नानासाहेब पवार, संजय राजपूत, रंगनाथ तोडकर, रेवणसिद्ध कापसे, मकबुल ढेकूळकर, अजित पाटील, संभाजी पाटील, जयदत्त मार्तंडे, प्रविण मुडके, उमेश मुडके, दिगंबर नारायणकर, कालिदास मुडके, नागनाथ गुळवे, यांचेसह सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.



