बीड
नारायणगड ने संतांच्या विचारांची जपणूक केली – हभप संभाजी महाराज

नारायणगड ने संतांच्या विचारांची जपणूक केली – हभप संभाजी महाराज
मादळमोही येथील तुकाराम महाराज संस्थान सप्ताहाची सांगता..
मठाधिपती हभप शिवाजी महाराज यांची उपस्थिती
कोळगांव, दि.१७ -गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील श्रीसंत जद्गुरु तुकाराम महाराज संस्थान येते ३७६ व्या तुकाराम बीज निमित्त दि.०९ मार्च ते १६ मार्च २०२५ दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याची सांगता मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी किर्तन सेवा करताना सांगितले की श्री क्षेत्र नारायण गडाने नेहमीच समाजहितासाठी काम केले असून गडावरुन संतांच्या विचारांची जपणूक केली आहे. धार्मिक, शिक्षण, व्यसनमुक्ती, सांस्कृतिक, धार्मिक विषयी प्रबोधन करण्यात आले.
गेवराई तालुक्यातील मादळमोही श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान येथे संस्थानचे मठाधिपती श्री. संभाजी महाराज यांच्या नियोजनाने तुकाराम बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहात भजन, हरिपाठ, पारायण, काकडा भजन, कीर्तन कथा प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात आलेे. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच काल्याच्या कीर्तन हभप महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज यांनी हरिकिर्तन आपल्या विचारातून व्यक्त केले. यावेळी तुकाराम महाराज यांच्या गाथेतील
धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥
ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥
खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥
तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥ या अभंगाच्या चरणातून सांगितले की, राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे विचार सांगितले. याचबरोबर नारायणगड संस्थान हे वारकरी संप्रदायाचे प्रसारक आहे. त्यांचे विचार आपण एक पाईक सेवेकरी म्हणून कार्य करत आहे. नारायणगड संस्थान हे सर्व जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे.नारायणगड ने कोणाचाही भेद केला नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अंमळ याप्रमाणे वारकरी संप्रदायाला पंरपरा आहे विचार आहे. तत्वज्ञान आहे. इतिहास टिकला पाहिजे.ज्ञानेश्वर तुकाराम गाथा, अभंग जगाच्या कल्याणासाठी आहे. उत्तराधिकारी ही जबाबदारी आहे. धार्मिक, शिक्षण, व्यसनमुक्ती, सांस्कृतिक, धार्मिक विषयी प्रबोधन करण्यात आले. यावेळी संत महंत, विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, भाविक भक्त, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हा सप्ताहासाठी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने तरुण मंडळ, जेष्ठ नागरिक, परिश्रम घेतले पंचक्रोशीत सप्ताहाची विशेष चर्चा होत आहे.
………….. चौकट
नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून सर्वत्र स्वागत अन् अभिनंदनाचा वर्षाव…
मादळमोही येथील जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे मठाधिपती ह भ प संभाजी महाराज मागील पंधरा वर्षांपासून गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा आणि विचारांची जपणूक करण्यासाठी आपल्या शांत संयमी सुसंस्कृत, मनमिळाऊ स्वभावाने, सर्वच भक्त गणाला आपलेच मानणारे नम्र, सक्षम नेतृत्वाचे प्रतिक असणारे संभाजी महाराज यांची ओळख मादळमोही कोळगाव पंचक्रोशीसह बीड जिल्ह्यात सर्वत्र परिचित झाले आहे. धाकटी पंढरी नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. या निवडीनंतर परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार होत आहेत. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून संभाजी महाराज यांचे स्वागत आणि सत्कार अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.



