संपादकीय

“स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही “

 

मुंबई | अभिनेते विक्रम गोखले यांनी तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं होतं. तसेच त्यांनी यावेळी शिवसेना आणि भाजप युती तुटणं ही चूक असल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले की, बाळासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं. हिंदुत्व आणि मराठी विचार रूजवला. संकट आले की बाळासाहेब हवे होते, याची आठवण येते. उद्धव ठाकरे सामान्य माणसांप्रमाणे जगतात. तोऱ्यात वागत नाहीत. हे मोठे यश आहे. विक्रम गोखले कोण ? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. अशा व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही. अशी व्यक्ती सेनेच्या आसपास फिरकू नये असा टोला त्यांनी लगावला होता. मुख्यमंत्र्यांनी नकली हिंदुत्वाचा धोका देशाला आहे असं म्हटल होते. तेच नकली हिंदुत्व सध्या पहायला मिळतंय असंही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते विक्रम गोखले ? भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं. राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच.

Back to top button