बीड

दत्त संस्थान बालाघाट येथे  चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरी होणार

दत्त संस्थान बालाघाट येथे  चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरी होणार
बीड प्रतिनिधी:-येथे जवळ असलेले  श्री दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे शनिवार दि.12 एप्रिल 2025 रोजी  प.पु.ष.ब्र.श्री 108 शिवानंद शिवाचार्य  महाराज तमलुरकर यांच्या कृपाशीर्वादाने, दत्त उपासक श्री.वैजनाथ महाराज शिंदे  यांच्या अधिपत्याखाली चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यात  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच मासिक पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेली आहे.
 पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की या  चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सवला उपस्थित राहून  महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी (मांजरसुंबा) व  महादेव अण्णा शेलार रा.शिवाजीनगर (उदंडवडगाव) यांनी केले आहे.
Back to top button