बीड

मराठवाडा भूषण आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नातून वाळुंज येथे ३ कोटी २९ लाखांची विकासकामे

मराठवाडा भूषण आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नातून वाळुंज येथे ३ कोटी २९ लाखांची विकासकामे

युवा नेते सागर धस यांच्या शुभहस्ते भव्य शुभारंभ संपन्

आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे
मराठवाडा भूषण, लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण ३ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ रविवार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता युवा नेते सागर धस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या अंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये खर्चाची संरक्षण भिंत, जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत २९ लाख रुपये, तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ५० लाख रुपये अशी एकूण ३ कोटी २९ लाख रुपयांची कामे मंजूर असून, त्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा नेते सागर धस म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास हा केवळ रस्ते व इमारतीपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. वाळुंज येथे उभारण्यात येणारी संरक्षण भिंत ही भविष्यातील संभाव्य आपत्तींपासून गावाचे संरक्षण करेल, तसेच हे काम अतिशय दर्जेदार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.तसेच पर्यटन विकासाच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री भैरवनाथ मंदिराच्या सुशोभीकरण व यात्रा परिसराचा कायापालट होणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावापर्यंत पोहोचवण्यासाठी
मराठवाडा भूषण आ. सुरेश धस हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यात विकासकामांचा वेग वाढला आहे. पुढील काळातही वाळुंज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या विकासकामांमुळे वाळुंज परिसरातील नागरिकांना सुरक्षितता, मूलभूत सुविधा व पर्यटन विकासाला चालना मिळणार असून, गावाच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लागणार आहे. या भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ, वाळुंज यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी मा.सरपंच विष्णू खाडे,सरपंच सुरेश सातपुते,उपसरपंच बंडु सोले,चेअरमन अशोक राऊत,जेष्ठनेते लालासाहेब शिंदे,डॉ.अनिकेत खाडे,बबन सोले, रावसाहेब वहाटुळे,भरत सोले,झुंबर राऊत, जालु राऊत,लहू खाडे,संदीप डिसले,भाऊ खाडे,कुलकर्णी देवा,बालु खाडे,किशोर सोले,भरत वहाटुळे,दीपक क्षीरसागर यांच्यासह वाळुंज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button