📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मोकळ्या जागेत मर्डर!; पोलिसांचा तपास सुरु, सकाळी-सकाळी उपनगरात काय घडलं?

मोकळ्या जागेत मर्डर!; पोलिसांचा तपास सुरु, सकाळी-सकाळी उपनगरात काय घडलं?

 

अहिल्यानगर । :-केडगाव उपनगरातील बुलेट शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत रविवारी (22 जून 2025) सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून, अज्ञात मारेकऱ्यांनी कठीण व टणक हत्याराने त्याच्यावर हल्ला करून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हणून त्यांनीच गुन्हा नोंदवला आहे. मृताची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिस पथके आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी भेट दिली.

पोलिसांनी सरकारी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून, खुनात वापरलेले हत्यार आणि अन्य पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपासासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. नॉन-टेक्निकल पद्धतीने तपास सुरू असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

किरकोळ कारणावरून शेतकऱ्यावर हल्ला
कापुरवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे किरकोळ वादातून सात जणांनी मिळून एका शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना 13 जून 2025 रोजी सकाळी 8:00 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी अनिल पोपट भगत (वय 41, रा. महाडुक सेंटर, कापुरवाडी) यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू हिरामण निकम, संदीप हिरामण निकम, हिरामण रेवजी निकम, अनिल भाऊराव पवार, ऋतिक अनिल पवार, गहिनीनाथ जाधव आणि लखन सुरेश माळी (सर्व रा. कापुरवाडी) यांनी लाईटची वायर तुटल्याच्या कारणावरून फिर्यादी अनिल भगत यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला केला. यात अनिल गंभीर जखमी झाला होते. त्यांनी नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अनिल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी 23 जून रोजी तक्रार नोंदवली. कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी स.पो.नि. जगदीश मुलगीर आणि पो.हेकॉ. दत्तात्रय मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तपास अधिकारी दत्तात्रय मोरे आणि जयश्री फुंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक आरोपींचा शोध घेत आहे

Back to top button