संपादकीय

या लक्षणांवरून समजेल तुम्हाला मुतखडा आहे का? हे उपाय ठरतील गुणकारी……

 

मूत्रपिंड हा आपल्या सर्वांच्या शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. मूत्रपिंडाची शरीरात अनेक महत्त्वाची कार्यं असतात. मूत्रपिंडाद्वारे शरीरातून मूत्र तयार होऊन बाहेर पडते. ती तंदुरुस्त राहण्यासाठी सकस आहार आणि पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे मूत्रपिंडाची समस्या असेल तर, त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतो. मूत्रपिंडांना जंतुसंसर्ग, मूत्रपिंडाचा कर्करोग , मूत्रपिंड निकामी होणं याशिवाय मुतखड्यासारख्या समस्यांमुळे लोक आजकाल त्रस्त झालेले दिसतात.

यामुळं मुतखडा तयार होतो. सध्या मुतखड्याची समस्या झपाट्यानं पसरताना दिसत आहे. मात्र, काही वेळा हा खडा इतका लहान असतो की, तो लवकर सापडत नाही. मुतखड्याचं दुखणं खूप असह्य असतं, हे सर्वांना माहीत आहे.तुमच्यामध्ये ही लक्षणे दिसली तर तुम्ही उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. तातडीनं औषधोपचार घ्यावेत. शिवाय, मुतखड्याच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहू शकता. मुतखड्याची लक्षणं तुम्हाला मुतखडा झाला असल्यास, तुमच्या ओटीपोटात आणि पाठीत तीव्र वेदना होऊ शकतात.

पुन्हा-पुन्हा उलट्या होतात किंवा मळमळण्याची समस्या होते. लघवी करताना रक्त येऊ शकतं. लघवीच्या संसर्गामुळं लघवीमध्ये तीव्र जळजळ होऊ शकते. ताप येऊ शकतो अचानक तुम्हाला घाम येणं सुरू होईल.भूक मंदावते. मुतखड्याच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी उपाय मुतखडा असेल तर, तुम्हाला कधीही वेदना होऊ शकतात.

हा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवावी लागेल. तसंच, मुतखडा होऊच नये म्हणून प्रौढ व्यक्तींनी दिवसभरात साडेतीन ते चार लिटर पाणी प्यावं.शिवाय, इतर द्रव पदार्थांचं योग्य प्रमाणात सेवन करावं. सोडियमचं आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केलं पाहिजे. शक्यतो अन्नात वरून मीठ घेऊन खाऊ नये. जास्त बिया असलेल्या फळं आणि भाज्यांचं सेवन टाळावं.तुळशीमध्ये व्हिटॅमिन बी असतं, त्यामुळे खड्यांच्या समस्येपासून सुटका मिळते

Back to top button