बीड

नगरसेविका प्रा.हिना इस्माईल सय्यद विक्रमी मताधिक्याने विजयी!

नगरसेविका प्रा.हिना इस्माईल सय्यद विक्रमी मताधिक्याने विजयी!

जामखेड प्रतिनिधी :जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा.हिना इस्माईल सय्यद यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत नागरिकांचा ठाम पाठिंबा मिळवला.नगरसेविका प्रा.हिना इस्माईल सय्यद यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

प्रा.हिना इस्माईल सय्यद यांचे वडील इस्माईल सय्यद यांना २००५ साली ग्रामपंचायत निवडणुकीत ११५० मतांच्या विक्रमी आघाडीसह विजय मिळवून सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक कार्याची भक्कम परंपरा निर्माण केली होती.त्याच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत प्रा. हिना इस्माईल सय्यद यांनीही लोकांचा विश्वास संपादन केला आहे.रोखठोक व सच्चा माणूस म्हणून इस्माईल सय्यद यांची ओळख आहे..

याच निवडणुकीत एक विश्वासू सहकारी काय असतो याचा आदर्श इस्माईल सय्यद यांनी दाखवून दिला. नगरसेवक पदासाठी दुसरे उमेदवार राजेंद्र आजिनाथ गोरे यांच्या बरोबर सहकारी म्हणून निष्ठावान भूमिका विशेष पार पाडली. सय्यद आणि गोरे ही जोडी प्रामाणिक व नैतिकदृष्ट्या मजबूत राजकारणाचे प्रतीक म्हणून आदर्श निर्माण केला आहे.या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेला विश्वास हाच विजयाचा कौल,याबद्दल मतदारांचे सय्यद यांनी आभार मानले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका प्रा. हिना सय्यद यांचे पती व इस्माईल सय्यद यांचे जावई वसीम शेख हेही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहतात.

यावेळी बोलताना इस्माईल सय्यद म्हणाले, आम्ही विरोधात असलो तरी,निवडणुकीत नागरिकांना आम्ही दिलेल्या आश्वासनांची शंभर टक्के पूर्ती करण्याचे प्रयत्न करणार आहोत. प्रभागासह शहरात स्वच्छता, शांतता, सुरक्षा, रस्ते, गटार, लाईट अशा विविध विकासकामांवर लक्ष केंद्रित करू. नागरिकांचा आम्हांवर असलेला विश्वास कायम टिकवून ठेवणे हेच आमचे ध्येय आहे.

या विजयामध्ये आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सहकारी उमेदवार व नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र गोरे,तसेच शहाजी काका राळेभात,सूर्यकांत नाना मोरे,डॉ.सादिक पठाण,डॉ.प्रशांत गायकवाड,शेख इस्माईल टेलर,पाशा भाई सय्यद,इस्माईल भाई पाटेवले,डॉ.समीर शेख, नम्मू फिटर,समीर काझी,जुबेर शेख,फयाज मुलाणी,शेख वाहेद, इजहार खान,शाहबाजशेख (अल्पना),शेख आसिफ (भिवंडी),अशपाक सय्यद, फिरोज शेख,आरिफ शेख, सरफराज शेख, शाहरुख शेख, साहिल शेख,अमन मुलाणी, अल्ताफ शेख,जुनैद शेख,नावेद शेख, सकलेन सय्यद, मोहसीन शेख, सुलतान इराणी, वसीम तांबोळी,अक्रम शेख,ऍड किरण शिरोळे,शिवाजी काळदाते,विकी चव्हाण,अरुण डोळस,दिनेश औचरे,रमेश तात्या,रोहित पवार, संतोष बेद्रे, युवराज पाचंग्रे, सचिन भैसडे, यांसह
लब्बय्यक यंग ग्रुप व नुरानी कॉलनीमधील नागरिकांचा विशेष सहकार्य लाभले.

Back to top button