निकृष्ट कामावर उपोषण करणारा नेता, पंचायत समितीत कामांचा धडाका लावणार

निकृष्ट कामावर उपोषण करणारा नेता, पंचायत समितीत कामांचा धडाका लावणार
साकत गणात राजकीय रंगत ; बळीराम कोल्हे पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज: ग्रामविकासात दिलेले योगदान चर्चेत
जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील साकत ग्रुप ग्रामपंचायतमधील कोल्हेवाडीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान भाजपा तालुका उपाध्यक्ष बळीराम बाजीराव कोल्हे हे येत्या पंचायत समिती निवडणुकीत साकत गणातून आपली उमेदवारी सादर करण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
कोल्हे यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोल्हेवाडी, पिंपळवाडी फाटा ते कोल्हेवाडी रस्ता, कोल्हेवाडी ते साकत रस्ता तसेच वांजरा फाटा ते कोल्हेवाडी रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करून गावाचा दळणवळणाचा प्रश्न सोडवला आहे.
तसेच कोल्हेवाडी गावात सभा मंडप, मराठी शाळा, वाडी वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आले तसेच मारुती मंदिर शिखर स्व खर्चातूनबांधणे त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कोल्हेवाडी ते वांजरा फाटा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बळीराम कोल्हे यांनी थेट उपोषणाला बसून काम थांबवले व कामाची गुणवत्ता सुधारण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या ठाम भूमिकेची गावकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
सध्या कोल्हे हे साकत ग्रामपंचायतीचे सदस्य असून भाजपा पक्षाने तसेच माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्याला पंचायत समितीसाठी संधी दिल्यास ती संधी ग्रामविकासाच्या दृष्टीने सोन्याची ठरविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांमध्ये कोल्हे यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.



