बीड

हलगी वाजवत, घरची भाकरी बांधून शेतकरी हक्क मोर्चात सहभागी होणार :- अर्जुन सोनवणे, विनोद घुमरे 

हलगी वाजवत, घरची भाकरी बांधून शेतकरी हक्क मोर्चात सहभागी होणार :- अर्जुन सोनवणे, विनोद घुमरे
शहाजानपूर रुई येथे शेतकरी हक्क मोर्चाच्या अनुषंगाने जागृती बैठक संपन्न
बीड (प्रतिनिधी) :(दि.१३ )शेतकरी, शेतकरी पुत्र व शेतीमित्रांचा भव्य “शेतकरी हक्क मोर्चा” बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी जागृती अभियानाची बैठक शहाजानपूर रुई येथे उत्साहात पार पडली.
बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी कापूस व सोयाबीन पिकांना योग्य भाव न मिळाल्याने मोठ्या संकटात सापडले आहेत. कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक, तर सोयाबीन खरेदी केंद्रांवर सरसकट लूट सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी शहाजानपूर रुई येथील शेतकरी हलगी वाजवत, घरच्या भाकरी बांधून हक्क मोर्चात सहभागी होणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने शेतकरी व शेतकरी पुत्रांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा शेतकरी अर्जुन सोनवणे व विनोद घुमरे यांनी केले.
यावेळी बीड येथून शेतकरी जागृतीसाठी उपस्थित युवा शेतकरी राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, शेतकरी पुत्र गणेश नाईकवाडे, स्वाभिमानी शेतकरी नेते राजू गायके यांनी आपली भूमिका मांडत मोर्चाला शेतकरी हक्क मोर्चास उपस्थित राहण्याचे आव्हान केले
विशेष म्हणजे, रात्री ९ वाजता कडाक्याच्या थंडीतही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीला या वेळी अर्जुन सोनवणे,विनोद घुमरे ,हनुमान गोर, तुकाराम वाखुरे,नामदेव गोरे भगीरथ घुमरे, गोविंद घुमरे, रामु नाना घुमरे, संतोष घुमरे हनुमान पिसाळ, आसाराम वाखुरे,प्रभु गोरे,नवनाथ घुगे,श्रीराम गोरे, रामकिशन सोनवणे,संतोष गव्हाने, लक्ष्मण गिरी, अजिनाथ सोनवणे,धोंडीराम घुमरे, ऋषिकेश काळे, बाबासाहेब सोनवणे, राधाकिसन सोनवणे, संदीपान पिसाळ,भाऊसाहेब पिसाळ, भीमराव घुमरे,सुभाष गोरे, सुभाष घुमरे, भास्कर सोनवणे,उपस्थित राहून मोर्चासाठीची तयारी दर्शवली.
Back to top button