संपादकीय
संसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी आजच्या युवक -युतीने मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे.- प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर

संसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी आजच्या युवक -युतीने मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे.- प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर
महिला कला महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न.
बीड प्रतिनिधी ;- माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय बीड येथे राज्यशास्त्र विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर , रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बबन बोबडे, डॉ. ज्योती गायकवाड आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम ताटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम ताटे यांनी केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मार्गदर्शन करताना म्हटले की, निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवसाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. लोकशाहीत मतदानाच्या मूल्याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि मतदानात सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवडणूक प्रक्रियामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक मताचा देशाच्या भवितव्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडू शकतो तेव्हा आजच्या युवक युवतींनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून लोकशाही सुदृढ करणे गरजेचे आहे असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मतदान करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थिनींना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम ताटे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते



