📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही, मी तुमच्या सोबत असेल -नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे

भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही, मी तुमच्या सोबत असेल -नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे
बीड (प्रतिनिधी) – शहरातील नवी भाजी मंडई येथे अतिक्रमणावर कारवाई करत असतांना एका भाजी विक्रेत्या महिलेची भाजी तसेच जेवणाचा डब्बा बळजबरीने उचलून ट्रॅक्टरमध्ये फेकल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात संबंधित कर्मचार्‍याविरूध्द निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज सकाळी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन त्यांना साडी-चोळी देत भविष्यात आपण पुर्ण ताकदीने पाठीशी असल्याचा विश्वास दिला. एवढेच नव्हे तर नवी भाजी मंडईत योग्य ठिकाणी जिथे अतिक्रमण नसेल त्या ठिकाणी जागा देण्याचा शब्द संबंधित महिलेला दिला. आज्जी तुम्ही काळजी करू नका, तुमचे कसलेही नुकसान होणार नाही. नवी भाजी मंडईतच तुम्हाला योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देते असे नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी सांगितले. भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही, मी तुमच्या सोबत असेल असाही शब्द यावेळी त्यांनी दिला.
Back to top button