बीड

विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल..

विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल..

बीड (प्रतिनिधी) – स्व.अजितदादांनी बीडकरांना दिलेला विकासाचा वादा पुर्ण करण्यासाठी आ.विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेत बीड शहरातील विविध समस्यांचा प्रत्यक्ष ऑन दि स्पॉट जाऊन आढावा घेतला. आ.विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, प्रतिनिधी शेख मुजीब, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, सभापती शेख निजाम आणि मुख्याधिकारी शैलेश फडसे, जेष्ठ नगरसेवक सय्यद सादेकुजमा, नगरसेवक महेश धांडे, शेख इकबाल यांच्यासह अन्य नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी आज दुपारी नवी भाजी मंडई, सिध्दीविनायक संकुल, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर, जिव्हाळा निराधार केंद्र आदि ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. नवी भाजी मंडई स्वच्छ आणि प्रशस्त करू, सिध्दीविनायक संकुलातील नियोजित मंडईची इमारत उपयोगात आणण्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करू, पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून जिव्हाळा केंद्रातील निराधारांना शासनाच्या संजय गांधी व इतर योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आ.विजयसिंह पंडित यांनी दिली.
बीड शहरात आज दुपारी आ.विजयसिंह पंडित यांनी विविध ठिकाणी भेट दिली. नवी भाजी मंडई परिसरात बांधण्यात आलेले गाळे, ओट्यांची पाहणी केली. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन त्याची दुरूस्ती करून स्वच्छतेसह प्रशस्त भाजी मंडई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आ.पंडित यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंडईतील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सिध्दीविनायक संकुलातील नियोजित भाजी मंडईच्या इमारतीची पाहणी करून या ठिकाणी भाजी विक्रेते येणार असतील तर सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देऊ किंवा ही जागा आणि इमारत अन्य काही कामाच्या अनुषंगाने वापरता येईल का ? हे देखील पाहु असे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर तातडीने सुशोभीकरण करून आवश्यक ती कामे हाती घेण्याच्या सुचना त्यांनी नगर पालिकेच्या यंत्रणेला केल्या. त्यानंतर आ.विजयसिंह पंडित यांनी नवी भाजी मंडईतील जिव्हाळा निवारा केंद्रात जाऊन तेथील निराधारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या निराधारांना शासनाच्या योजनेतून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. एकूणच आ.विजयसिंह पंडित यांनी आणि नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या टीमने तब्बल 3 ते 4 तास मॅरेथॉन पाहणी करून विविध समस्यांचा आढावा घेत विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे.
Back to top button