बीड

अखेर मुंडे सरांच्या कर्तव्य निष्ठेचा राज्यकर्त्यांनी घेतला 25 वा बळी म्हणून राज्यकर्ते ठरले बळी तो कानपिळी

अखेर मुंडे सरांच्या कर्तव्य निष्ठेचा राज्यकर्त्यांनी घेतला 25 वा बळी म्हणून राज्यकर्ते ठरले बळी तो कानपिळी

तुकाराम मुंडे — 2005 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी — प्रामाणिकपणा आणि कडक प्रशासनासाठी ओळखले जातात. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवेत आतापर्यंत 25 वेळा बदली झाली आहे; बहुतेक पोस्टिंग एक-दोन वर्षांपेक्षाही कमी काळ टिकली. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची असंघटित कामगार आयुक्तपदावरून दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली झाली. दिव्यांग कल्याण विभागात श्रीयुत तुकाराम मुंढे यांनी सचिव पदाचा कार्यभार घेताच दिव्यांग क्षेत्रात गैरमार्गाने सत्ता , संपत्ती, पैसा या जोरावर अधिराज्य करुन कार्यरत संस्थाचालक यांचे धाबे दणाणले होते. याचा परिणाम हा की, ऑगस्ट 2025 पासून दि. 31 मार्च 2026 अखेर दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव म्हणून कर्तव्य निष्ठेने कार्यरत राहुन एकुण 900-950 दिव्यांग क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था विरुद्ध श्रीयुत.तुकाराम मुंढे यांनी कठोरात कठोर कार्यवाही करून अन्यायाचे परिमार्जन केले. तसेच शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत संशयास्पद दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांची शोधमोहीम गतिमान करुन बनावट दिव्यांगत्व धारण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ केले.याच कर्तव्य निष्ठेचे फलित म्हणून राज्यकर्त्यांनी तुकाराम मुंढे यांची 25वी बदली करून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचे जाणिवपूर्वक खच्चीकरण करुन राजसत्तेचा उन्माद प्रगट केला. म्हणूनच भारतीय प्रशासन सेवेत प्रामाणिकपणे व कर्तव्य निष्ठेने कार्यरत श्रीयुत तुकाराम मुंडेंच्या वारंवार बदल्या मागचा मागोवा सर्वसाधारणपणे असा पुनश्च अधोरेखित होतो : नाशिक, नागपूर, नवी मुंबई येथील महानगरपालिका आयुक्तपदे, तसेच विविध विभागांमध्ये कडक कारवाई (बांधकाम अनियमितता, वाळू माफिया, भ्रष्टाचाराविरोधी छापे) केल्यावर राजकीय नेत्यांशी संघर्ष होतो, आणि काही महिन्यांतच बदली होते. नागरिकांमध्ये त्यांना “लोकाभिमुख” अधिकारी म्हणून पाठिंबा मिळतो व नवी मुंबईत त्यांच्या बदलीविरोधात हजारो स्वाक्षऱ्या जमा झाल्या होत्या; पण स्थानिक राजकारणी त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे नेहमीच अस्वस्थ होतात. यास्तव माध्यमे आणि नागरी गट वारंवार हे बदल्या “प्रामाणिकपणाचा दंड” म्हणून वर्णन करतात.
म्हणून बदलीने “25 वा बळी” हा उल्लेख त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत सततच्या राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम म्हणून केला जातो. प्रशासनात कर्तव्य निष्ठेने कार्यरत राहिल्याबद्दल वारंवार बदलीद्वारे शिक्षा, आणि निर्णय घेणारे राज्यकर्ते “बळी तो कानपिळी” या म्हणीप्रमाणे वागतात, अशी टीका श्रीयुत तुकाराम मुंढे भा.प्र.से यांच्या समर्थकांकडून होते व ती समर्थनीय आहे.
Back to top button