बीड

आपला परिवाराच्या मनीषा पवार यांचा देहदानाचा संकल्प

आपला परिवाराच्या मनीषा पवार यांचा देहदानाचा संकल्प
ज्येष्ठ समाजसेविका विना गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त केला संकल्प
बीड (प्रतिनिधी) ;-जिवंतपणी सामाजिक कार्यात योगदान दिले. मात्र मरणानंतरही देहाचा उपयोग समाजासाठी व्हावा या उदात्त हेतूने  नेकनूर येथील आपला परिवारच्या संचालक मनीषा पवार यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. ज्येष्ठ समाजसेविका विना गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त पवार यांनी हा संकल्प केला आहे. या संबंधीचे प्रतिज्ञापत्र 10 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईच्या स्वा.ती.ग्रा.शा.वै.म.शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुखांच्या सहीनिशी मनिषा पवार यांना दिले आहे.
ज्येष्ठ समाजसेविका विना गोखले या आर्टिस्ट्री संस्थेच्या माध्यमातून सामाजिक संस्थांसाठी मोठे काम करत आहेत. पुणे मुंबई व ठाणे येथे विविध विषयात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना सहाय्य करण्यासाठी ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम गेल्या वीस वर्षांपासून चालवत आहेत. या माध्यमातून निमशहरी,ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागातील सामाजिक संस्थांना मदत करणे हा मुख्य उद्देश असतो. 8 जानेवारीला त्यांचा वाढदिवस झाला. याचे औचित्य साधून 7 जानेवारी रोजी मनिषा पवार यांनी देहदानाचा फॉर्म भरून दिला होता. या संबंधीचे प्रतिज्ञापत्र 10 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईच्या स्वा.ती.ग्रा.शा.वै.म.शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुखांच्या सहीनिशी मनिषा पवार यांना दिले आहे. मनीषा पवार या नेकनूर जवळील कळसंबर येथे आपला परिवार वृद्धाश्रम चालवत आहेत. इथे अंध अपंग निराधार व बेघर आजी-आजोबांची सेवा व सुश्रुषा केली जाते.या संस्थेला शासनाचे कसलेही अनुदान नसून फक्त लोकसहभागावरच सदरील संस्था चालते.या कामी त्यांचा परिवार त्यांना मदत करतो.मृत्यू पश्चातही आपल्या शरीराचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असून,त्यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.या निर्णयामुळे समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.
Back to top button