📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निराधारांना मातृभूमी प्रतिष्ठान कडून ब्लॅंकेट व माकड टोपीचे वाटप.   

निराधारांना मातृभूमी प्रतिष्ठान कडून ब्लॅंकेट व माकड टोपीचे वाटप.
 बीड ( प्रतिनिधी) : लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त दिनांक 12 डिसेंबर २०२५ रोजी शहरातील बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून मातृभूमी प्रतिष्ठान व मराठवाडा शिक्षक महासंघाच्या वतीने माकड टोपी तसेच रस्त्यावरील  मनोरुग्णांना ब्लॅंकेट चे वाटप डॉ. संजय तांदळे व प्राचार्य डी.जी. तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेघर जीव्हाळा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य,व्यवस्थापक राजू वंजारे, काळजीवाहक छाया सरोदे, डॉ.लक्ष्मण पवळ, नितीन जायभाये, सुदाम कोळेकर, लक्ष्मण चाटे आदींची उपस्थिती होती.z
Back to top button