रत्नागिरी

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयाच्या वाचकवीरांचा विशेष सन्मान

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयाच्या वाचकवीरांचा विशेष सन्मान

चिपळूण प्रतिनिधी – प्रदीप पवार
सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता.चिपळूण हे प्राथमिक विद्यालय उपक्रमशील विद्यालय आहे. विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमासोबत शाळेने वाचनासाठी विशेष काम केले आहे. एक पुस्तक शाळेसाठी, महावाचन चळवळ, वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट, अशा विविध उपक्रमातून शाळेच्या ग्रंथालयात ५००० पेक्षा अधिक पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्याचा उपयोग नियमितपणे वाचन कट्टा, फिरते ग्रंथालय, पुस्तक आपल्या दारी, वाचू आनंदे, पुस्तकाचे झाड, गोष्टीचा शनिवार, एक तास वाचनासाठी, महावाचन चळवळ अशा विविध उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांचे वाचन समृध्द करण्यासाठी शाळा नियमित प्रयत्न करीत आहे. यातून महिन्याला सर्वाधिक पुस्तके वाचणा-या विद्यार्थ्यांचा वाचकवीर पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. त्यातून इतर विद्यार्थ्यांना वाचनाची स्फुर्ती मिळते. वर्षभरात कु .जान्हवी प्रदीपकुमार यादव , कु .भार्गवी सचिन कदम , कु. आरव तुषार खालकर, कु . जुई संजय शिंदे, कु.सर्वांग रोहित देसाई , कु. स्मित समीर पिलवलकर , कु. सुयश संतोष सोलकर , कु. रुची दीपक घावरे , कु. मैथिली वैभव राणे , कु.मोक्षदा नंदकुमार हटकर , कु . निकुंज नितीन शिगवण , कु. सई महेंद्र बैकर , कु .दिया किरण म्हादे, कु.समर्थ गजानन लाड , कु .मनस्वी सचिन कदम , कु .प्रज्वल विनोद हुब्बळकर, कु. अनया संतोष लांबे , कु . श्रयांश रितेश जाधव या विद्यार्थ्यांनी वाचकवीर पुरस्कार प्राप्त केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सौ .मनीषा कांबळी, सौ . रश्मी राजेशिर्के , श्री संदेश सावंत , सौ . अपूर्वा शिंदे , श्रीम. वृषाली राणे , श्रीम .अर्चना देशमुख , श्रीम. ज्योती चाळके , सौ . रुपाली खरात ,श्रीम. वर्षा सकपाळ , सौ .शितल पाटील व सौ .स्वरा भुरण यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले .

Back to top button