बीड

आज आ.सुनिल शेळके यांची जामखेड येथे जाहीर सभा

आज आ.सुनिल शेळके यांची जामखेड येथे जाहीर सभा

अजित पवार गटाची मोर्चेबांधणी जोरात;भाजप-शरद पवार गटात खळबळ
——————————————–

जामखेड – जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) रॅली, कॉर्नर सभा व होम टू होम प्रचार व उमेदवारांची कोरी पाटी यामुळे नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने धसका घेतला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आ. सुनिल आण्णा शेळके, ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कल्याण (काका) आखाडे,माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या तोफा आज दुपारी ३.०० वाजता धडाडणार असल्याने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) चांगलीच कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी उपनगराध्यक्ष असताना केलेली विकासकामे, कोरोना काळात केलेले सामाजिक कामे, एका फोनवर चोवीस तास नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा अशी प्रतिमा असल्याने ते आपल्या सर्व उमेदवारासह घरोघर पोहचले. अनेक नागरिक महेश निमोणकर यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन आठवण काढत आहेत. महासंग्राम युवा मंचच्या वतीने मागील दहा वर्षापासून गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिर आयोजित करून आत्तापर्यंत १८०० पिशव्या रक्त संकलन करून नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. त्यांचा सर्व धर्मिय लोकांबरोबर असलेले आपुलकीचे संबध या सर्व कारणांमुळे मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला स्विकारले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णा महेश निमोणकर व इतर अकरा उमेदवार विजयाच्या जवळ पोहचले आहेत.

भारतीय जनता पक्षाने महायुतीचा धर्म न पाळता घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना यांना
युती होणार नाही अशी दुटप्पी भूमिका घेऊन ते स्वबळावर लढणार नाही अशी काळजी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, तालुका उपाध्यक्ष बापुराव शिंदे, युवा नेते अक्षय शिंदे, सुरज रसाळ यांनी मोट बांधली व महेश निमोणकर यांच्यावर विश्वास व्यक्त करून उमेदवार निवडीचे स्वातंत्र दिले. महेश निमोणकर यांनी शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांची जुळवाजुळव करून स्वबळावर निवडणूकीची यंत्रणा हाताळली.

प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार) ने कमी लेखले पण तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी रात्रीचा दिवस करून प्रचंड मेहनत घेऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा महेश निमोणकर, सौ. सारिका संजय डोके, सुरज अशोक निमोणकर, सौ. द्वारका चंद्रकांत पवार,
सौ. पूजा राजू शिंदे, सौ. नजमा नदीम सय्यद, मिठूलाल पोपटलाल नवलाखा, गणेश भिकू काळे, सौ. मुक्ता दिगांबर म्हेत्रे, शेख इरफान सलाउद्दीन, सौ. ताहेरा सद्रोद्दीन शेख, महेश भारत निमोणकर या सर्व उमेदवारांना स्पर्धेत आणून विजयाच्या समीप आणले आहे. त्यामुळे दोन राजकीय पक्षा भोवती फिरणारी निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाभोवती फिरत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक सुनिल आण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष, कल्याण काका आखाडे, आष्टी पाटोदा शिरूरचे माजी आमदार बाळासाहेब काका आजबे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष
सुनिल भाऊ मगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, प्रभारी निरीक्षक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र काका गुंड यांच्या तोफा शुक्रवारी जुन्या तहसील कार्यालयासमोर सभेत धडाडणार आहेत. या सभेने मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button