बीड
विमानतळ नको, जायकवाडीचे पाणी द्या १४० गावातील शेतकऱ्यांचा टाहो, तांदळा येथील उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा

विमानतळ नको, जायकवाडीचे पाणी द्या
१४० गावातील शेतकऱ्यांचा टाहो, तांदळा येथील उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा
मादळमोही दि,२५ (प्रकाश डोंगरे) :-बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १४० गावातील शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या पाण्यासाठी लोकलढा उभारला असून या लोकलढा आंदोलनातून एक चळवळ निर्माण झाली आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी मौजे तांदळा ता.गेवराई येथे अजय पाटील साळुंखे आमरण उपोषणाला बसले असून दुष्काळी भागातील १४० गावातून उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. अजितदादा कामाचा माणूस आहे, दादा आम्हाला विमानतळ नको तर जायकवाडीचे पाणी द्या, अशी मागणी अंदोलकांकडून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अजय पाटील साळुंखे यांनी तांदळा येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. यात प्रामुख्याने जायकवाडी धरणातून पाणी लिफ्ट करुन भगवान गडाच्या पायथ्याशी शिंगारवाडी फाट्याजवळ टाकण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग लगत कालवा करुन तांदळा, कोळगाव, मादळमोही, पाडळशिंगी, पाचेगाव, मार्गे कालवा तयार करावा, तसेच सिंदफना नदी पात्रात पाणी सोडावे, याचा फायदा १४० पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना होणार असून गेवराई, बीड, माजलगाव, शिरूर कासार (आष्टी)विधानसभा मतदारसंघातील कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. सह, सिंदफणा नदीवर साखळी बंधारे बांधावे,शेतकरी कर्ज माफी,पिक विमा अदी प्रश्नांवर आमरण उपोषण करण्यात आले आहे.यावेळी भाऊसाहेब जरांगे पाटील, बप्पासाहेब अण्णा तळेकर, यशराज बदामराव पंडित, तालुकाध्यक्ष उद्धव मडके, लोकलढा आंदोलनाचे समन्वयक दिनेश गुळवे, पत्रकार राहुल लोंढे, सरपंच नवनाथ गवते, सरपंच तुकाराम तळतकर, बाळासाहेब घाडगे,राजूभाऊ जहागिरदार, बालासाहेब शेरकर, तात्या नागरगोजे, गणेश हाडुळे, पत्रकार संतोष भारती, पत्रकार विनोद नरसाळे, अप्पासाहेब महानोर, आदीनाथ जोगदंड, काशीनाथ जोगदंड पाटील, शामराव घुगे, गणेश जाधव, दीपक जाधव, देविदास वाणी, केशव हाडुळे, ज्ञानेश्वर शेरकर, ओंकार शेंबडे, सह १४० गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मौजे तांदळा येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी तांदळा गावातून टाळ मृदंगाच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी हरि नामाचा गजर करण्यात आला.
लढा न्याय हक्काचा: अजय पाटील साळुंखे
१४० गावातील शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या पाण्यासाठी लोकलढा उभारला असून उपोषणकर्ते अजय पाटील साळुंखे म्हणाले की,१४० गावातील शेतकऱ्यांनी न्याय व हक्क मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
पाण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू- गुळवे
शिरूरपासून माजलगावपर्यंतचे शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. या शेतर्यांच्या शेतीला बारमाही व जायकवाडीचे पाणी मिळणे गरजेचे आहे. हे पाणी जो पर्यंत शेतीला मिळणार नाही, तो पर्यंत संघर्ष करू असे प्रतिपादन यावेळी लोकलढा आंदोलनाचे समन्वयक दिनेश गुळवे यांनी केले.



