तेलंगशी शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.. सरपंच दिगंबर ढाळे व केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत..

तेलंगशी शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा..
सरपंच दिगंबर ढाळे व केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत..
जामखेड प्रतिनिधी – जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी येथे शैक्षणिक वर्षाची सुरुवात शाळा प्रवेशोत्सवाने उत्साहात करण्यात आली. शाळेत दाखल झालेल्या बालकांचे पुष्पगुच्छ देऊन औक्षण करण्यात आले. जल्लोषात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.विशेष म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख केशव गायकवाड ,सरपंच दिगंबर ढाळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवननाथ ढाळे,ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे,आण्णा काळे,नंदकुमार ढाळे,बाजीराव पठारे ,मुख्याध्यापक संतोष गोरे,विषयतज्ज्ञ शशिकांत वैद्य यांच्यासह पालक व शिक्षक उपस्थित होते.
मोफत पाठ्यपुस्तके,गणवेश व शुज साॅक्स वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.शालेय परिसर सुशोभीकरण करुन शाळापूर्वतयारी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना मिष्ठ्ठान्न भोजन देण्यात आले.केंद्रप्रमुख केशव गायकवाड,भरत ढाळे यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष गोरे , सूञसंचलन विजयकुमार रेणुके यांनी तर आभारप्रदर्शन रविंद्र धस यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशेन चेंटमपल्ले,लक्ष्मी जायभाय,अशोक जाधव व विकास पाचरणे यांनी परिश्रम घेतले.



