शाहीर तुकाराम काळे यांचा जि. प.प्रा.केंद्र शाळा पाटोदा येथे प्रबोधन कार्यक्रम

शाहीर तुकाराम काळे यांचा जि. प.प्रा.केंद्र शाळा पाटोदा येथे प्रबोधन कार्यक्रम
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पाटोदा या ठिकाणी अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, पाटोदा शाळेचे आदर्श मुख्याध्यापक माननीय उत्तम पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ५ मार्च २०२६ रोजी “तुकाराम बीज” चे औचित्य साधून तुकाराम महाराजांचे विज्ञान वादी विचार या कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माननीय सचिन टापरे उपस्थित होते. हा कार्यक्रम आष्टी येथील हरहुन्नरी कलाकार, समाज सेवक, लोकशाहीर माननीय तुकाराम काळे यांनी सादर केला. त्यांनी शाळेतील विध्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन वर आधारित खुप छान अशी माहिती दिली. देश भक्तीपर गीते व समाज प्रबोधन पर गीत गायन केले. अनेक मजेदार जादूचे प्रयोग करून दाखवले. मुलांना आवडतील अश्या मजेदार बोधकथा गोष्टीरूपात सांगितल्या.
या कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक माननीय जितेंद्र आढाव,संतोष डोके, श्रीम.गीता रासने आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
तुकाराम काळे यांचा परिचय मुख्याध्यापक माननीय उत्तम पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन माननीय अनिल अष्टेकर यांनी मानले.



