बीड
उद्योगविश्वात आदित्य पॉलिटेक्निकची दमदार झेप; विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण औद्योगिक मोहीम

—
वीज निर्मितीची प्रक्रिया, कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनासह विद्यार्थ्यांनी औद्योगिक सुरक्षिततेचे नियम घेतले जाणून

प्रतिनिधी | बीड
विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण औद्योगिक मोहीम तांत्रिक शिक्षणाला उद्योग क्षेत्राची प्रत्यक्ष जोड देण्याच्या उद्देशाने बीड येथील आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत जयसिंगपूर व शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या भेटीत विद्यार्थांनी वीज निर्मितीची प्रक्रिया, कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनासह औद्योगिक सुरक्षिततेचे नियम जाणून घेतले.
औद्योगिक भेटीची संकल्पना संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रीराम इलेक्ट्रिकल लिमिटेड, जयसिंगपूर येथे कॅपॅसिटर निर्मिती प्रक्रियेचे सखोल निरीक्षण केले. कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी पद्धती, विविध तांत्रिक चाचण्या, औद्योगिक सुरक्षिततेचे नियम यांची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांना पॉवर फॅक्टर सुधारणा, रिऍक्टिव्ह पॉवर व्यवस्थापनाचे महत्त्व प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी वसंत इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड येथे ट्रान्सफॉर्मर कोअर असेंब्ली, एलव्ही व एचव्ही वाइंडिंग, व्हॅक्युम ऑईल फिलिंग प्रक्रिया, इन्सुलेशन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. टेस्टिंग लॅबमध्ये शॉर्ट सर्किट टेस्ट, रेशो टेस्ट, इन्सुलेशन रेसिस्टन्स टेस्ट यांचे प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांचा तांत्रिक आत्मविश्वास वाढला. तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी श्रीदत्त पावर प्लांट, शिरोळ येथे को-जनरेशन पद्धतीद्वारे वीज निर्मितीची संपूर्ण साखळी समजून घेतली. बॉयलरमधील वाफ निर्मिती, टर्बाईनची कार्यप्रणाली, जनरेटर समक्रमण, कंट्रोल रूममधील डिजिटल मॉनिटरिंग प्रणालीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. उद्योगातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. करिअर संधी, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.
या औद्योगिक भेटीस संस्थेचे संचालक डॉ. आदित्य सारडा, प्राचार्य डॉ. राहुल खडके, विभागप्रमुख प्रा. जाधव डी.एम. तसेच प्रा. शहाणे एस.बी., प्रा. कांबळे पी.व्ही. व प्रा. वीर ए.एम. यांचे मार्गदर्शन लाभले.
—-
विद्यार्थ्यांनी उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव घेतल्यास त्यांची संकल्पना अधिक स्पष्ट होते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे अशा प्रकारचे उद्योगाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
-डॉ. आदित्य सारडा, संचालक आदित्य शिक्षण संस्था, बीड