📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सांगवी सारणी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सांगवी सारणी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
केज/प्रतिनिधी :-शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 सुरुवात झालेली असुन प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरे केले जात आहेत.त्यापैकी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सांगवी सारणी या शाळेत आगळा वेगळा प्रवेशोत्सव साजरा करत पालकांचे व नवगतांचे लक्ष वेधले गेले.पारंपारिकपध्दतीने बैलगाडी सजवुन,बँड पथक लावून पूर्णगावात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता 1 ली वर्गातील मुलामुलींची मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी रांगोळ्या, पुष्पवृष्टी करण्यात आली.नवीन विद्यार्थ्यांचे गावात जागोजागी महिला सदस्यांनी औक्षण करत या चिमुकल्याना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. या मुलांचे पायाचे ठसे घेऊन माझे शाळेत पहिले पाऊल म्हणून शाळेच्या परिसरात लावण्यात आले.सर्व शाळा व प्रत्येक वर्ग फुलांनी,फुग्यानी, झिरमाळ्या,पताका यांनी सजवुन वातावरण निर्मिती करण्यात आली होती.पालकांना गावकऱ्यांना यावेळी या वर्षी पहिली वर्गापासून सुरु होणाऱ्या सी.बी.एस.ई अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली.गावकरी, पालक यांच्या हातून मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
अगदी आनंदात, उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सह शिक्षक सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. जगताप गणेश यांनी मेहनतघेतली.पालकांना शाळेच्या विकासाबाबत व प्रगतीबाबत जागृतीचे आवाहन मुख्याध्यापक महादेव ढाकणे यांनी केले तर सी.बी.एस.ई अभ्यासक्रमा बाबत माहिती सहशिक्षिका श्रीमती नयना शिंदे यांनी दिली.
Back to top button