📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आष्टीत महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय महोत्सव उत्साहात

आष्टीत महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय महोत्सव उत्साहात
आ. सुरेश धस यांनी भक्तांच्या रांगेत उभं राहून घेतले पिंपळेश्वरांचे दर्शन
आष्टी (प्रतिनिधी)
श्री क्षेत्र पिंपळेश्वर महादेव देवस्थान मंदिरात  महाशिवरात्री उत्सवानिमित्त तीन दिवसीय महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे आयोजन श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, श्री पिंपळेश्वर देवस्थान समिती आष्टी तसेच समस्त ग्रामस्थ आष्टी मुर्शदपुर यांच्या वतीने करण्यात आले होते.
उत्सव काळात दररोज अभिषेक, महाआरती व दैनंदिन महाआरतीचे आयोजन करण्यात आले. तसेच कीर्तन केसरी ह भ प ज्ञानेश्वर महाराज कोठुळे भिवंडीकर यांचे प्रभावी कीर्तन पार पडले. त्यांच्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
उत्सवाची सांगता भव्य शोभायात्रेने झाली. या शोभायात्रेत सुमारे अडीचशे वारकरी मुला-मुलींच्या टाळ-मृदंग भजनी मंडळ पथकाने सहभाग घेतला होता. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मराठवाडा भूषण लोकनेते सुरेश धस यांनी मंदिरात उपस्थित राहून पिंपळेश्वरांचे दर्शन घेतले व भाविकांशी संवाद साधला. महाशिवरात्रीनिमित्त आष्टी मुर्शदपूर परिसरासह तालुक्यातील लाखो भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवामुळे आष्टी शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
Back to top button