📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गेवराईत आज जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या बैठकीला उपस्थित रहा – शिवराज पवार

गेवराईत आज जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या बैठकीला उपस्थित रहा – शिवराज पवार
—————————–
गेवराई ( प्रतिनिधी ) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराईत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, भाजप नेते बाळराजे पवार व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत भाजपच्या इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली असून निवडणुकीसाठी इच्छुक भाजप उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवानेते शिवराज पवार यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
       माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि युवा नेते बाळराजे पवार हे दोघेही भारतीय जनता पार्टीत एकत्र आल्याने नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितच वाढलेली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची सुद्धा गर्दी वाढल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी गेवराई शहरातील कोल्हार रोडवर असलेल्या गजानन मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, भाजपा नेते बाळराजे पवार, माजी मंत्री बदामरावजी पंडित, माजी जिल्हा परिषद सभापती युधाजित पंडित, प्रदेश कार्यकारणी सदस्य सर्जेराव तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा उपाध्यक्ष सुंदर चव्हाण, जिल्हा सचिव ॲड सुरेश हात्ते, युवा नेते रोहित पंडित, समन्वयक गेवराई विधानसभा श्रीकांत सानप, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश सुरवसे, सचिन दाभाडे, मनोज पाटील, राजेश पवार, उद्धव रासकर, सौ रूपालीताई कचरे  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 या बैठकीला गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी तसेच बदामराव पंडित मित्र मंडळातील सर्व ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप युवा नेते शिवराज पवार यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Back to top button